दिवाळी फराळाची चव महागली : किमतीत सुमारे 20 ते 30 टक्क्यांची वाढ

ऑक्टोबर 18, 2022 11:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । दिवाळी अली कि जी गोष्ट आपल्या सर्वांना खूप आवडते ती म्हणजे फराळ. कारण यावेळी कपडे, दागिने, मिठाई सोबतच फराळ एक महत्वाचा प्रकार म्हटला जातो. ग्राहकांकडून सर्वाधिक मोठ्या प्रमाणात फराळाची खरेदी केली जाते. मात्र यंदा फराळ महागला आहे. यासाठी नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

faral 1 jpg webp

तब्बल २ वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात आहे. अवघ्या आठ दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. यामुळे आता सर्वच घरांमध्ये गृहिणींची लगबग सुरु झाली आहे. याच बरोबर फराळाची बाजारपेठ सजली आहे. मात्र यंदा सर्वच गोष्टीचे दर वाढल्याने फराळ देखील महागला आहे. फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर देखील ;वाढले असल्याने फराळाच्या दरात सुमारे 20 ते 30 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

दसरा झाला की रेडिमेड फराळ तयार करणारे महिलांचे बचतगट, संस्था तसेच घरगुती लघुउद्योजकांकडून हा फराळ तयार करण्यासाठी लगबग सुरू होते. जिल्ह्यात व शहरात जुने खव्वय्ये असून ते घरगुती पद्धतीने फराळ बविण्याला प्राधान्य देतात. यामध्ये चकली, चिवडा, राव लाडू, शंकरपाळे आदी मिठाईचे पदार्थ बनविले जातात. याच रेडिमेड मिठाईला जळगावकर पसंती देत असून रेडिमेड मिठाईला मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.

यंदा स्पेशल भाजणी चकली ४०० ते ५०० रुपये किलो, रवा, रवा नारळ, रवा बेसन, बेसन लाडू सुमारे ३०० ते ४०० रुपये किलो आहेत. चिवडा ३०० – ४०० रुपये आहे., साधी शेव 250 रुपये तर लसूण शेवही 300 रुपये किलो असा दर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now