लहानग्या स्वयंसेवकांने वेधले जळगावकरांचे लक्ष!

ऑक्टोबर 5, 2022 5:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । विजयादशमीला जळगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचालन करण्यात आले. गोकुळ स्वीट मार्टपासून आयोजित पथसंचालनात लहानग्या स्वयंसेवकांने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

jalgaon 2022 10 05T173817.163 jpg webp

जळगाव शहरात विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचालन करण्यात येते. बुधवार दि.५ रोजी सकाळी ७ वाजता रिंगरोड येथील गोकुळ स्वीट मार्टकडून पथसंचालनाला सुरुवात झाली. पथसंचलनात ध्रुवीत उर्फ कान्हा सुरज झंवर या दोन वर्षीय चिमुकल्याने लक्ष वेधून घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात चिमुकला सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now