---Advertisement---
जळगाव जिल्हा पाचोरा

धावत्या रेल्वेतून उतरताना घसरला पाय; तरुणाच्या अंगावरून गेले आठ डब्बे

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| ५ ऑगस्ट २०२३। पाचोरा रेल्वेस्थानकावरुन धावणाऱ्या मंगला एक्स्प्रेसमधुन उतरण्याचा प्रयत्न करत असलेला तरुण धावत्या रेल्वेखाली आला. मंगला एक्स्प्रेसचे आठ डब्बे तरुणाच्या अंगावरुन निघुन गेले. मात्र सुदैवाने या घटनेत तरुण बचावला असुन या अपघातात तरुणाच्या डाव्या पायाची पाचही बोटे कापली गेली आहे.

jalgaon mahanagar palika 36 jpg webp webp

राहुल जयंत भदाणे (वय – २९) रा. पडासखेडे ता. पारोळा हा तरुण सांगली येथे खाजगी कामानिमित्त गेला होता. दरम्यान ४ ऑगस्ट रोजी राहुल मंगला एक्स्प्रेसमध्ये बसला. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वेस्थानका नजीक मंगला एक्स्प्रेस धिम्या गतीने जात असतांना राहुल याने एक्सप्रेसमधुन उतरण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी राहुल याचा पाय घसरला व तो एक्स्प्रेसखाली सापडला. मंगला एक्स्प्रेसचे आठ डब्बे राहुल याचे अंगावरुन गेले.

---Advertisement---

या अपघातात सुदैवाने राहुल भदाणे याचे प्राण वाचले असले तरी राहुल यास आपल्या डाव्या पायाची पाचही बोटे गमवावी लागली आहे. घटनेची माहिती मिळताच, लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात पो. काॅ. विलास जाधव हे जय मल्हार रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व दादु पाटील यांचेसह घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करत रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व दादु पाटील यांच्या मदतीने राहुल भदाणे यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन, त्यावर उपचार सुरू आहेत.

घटने प्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे पी. एस. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल विलास जाधव हे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---