⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

सिग्नेचर चित्रपटाला बेस्ट इंडीयन शॉर्ट फ़िल्मचा पुरस्कार जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ । अंकित अग्रवाल दिग्दर्शित सिग्नेचर या लघुपटाने इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल मध्ये बाजी मारली आहे. गोल्डन स्पैरो इंटरनँशनल फिल्म फेस्टिवल मध्ये बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार या लघुपटाला मिळाला. याशिवाय लिफ्ट ऑफ सेशन यूके मधे सुद्धा या लघुपटाची निवड करण्यात आली आहे.

या लघुपटाची भाषा हिंदी मध्ये असून या लघुपटाची निर्मिती अग्रवाल ज्वेलर्स चे मालक संजय अग्रवाल व त्यांची पत्नी किरण अग्रवाल यांनी केले आहे. याचे चित्रिकरण अजिंक्य जैन यांनी केले आहे.हा चित्रपट एका ग्रामीण भागातील अशिक्षित महिलेवर आधारित आहेे. या लघुपटात प्रतिभा विश्वकर्मा भारतेंदु नाट्य अकादमी लखनऊ,आर्या चौधरी श्रीराम मॅक्रो व्हिजन अँकॅडमी, रावेर,हे मुख्य भुमिकेत आहेत. तसेच लखन महाजन आणि वंदना पाटील,सहकलाकार असून आफरिन सलीम तडवी ही कुसंबा येथील सरपंच यांची मुलगी आहेत ,व अक्षदा वाघ,जि.प.शाळा कुसुंबे मधील विद्यार्थ्यीनी सह बालकलाकार आहेत.

WhatsApp Image 2021 07 19 at 18.47.31

दिग्दर्शक् अंकित अग्रवाल म्हणाले माझ्या डोक्यात ही कथा बर-याच दिवसांपासून होती पण इंडस्ट्रीमंध्ये काम करत असतांना याला वेळ देणे कठिण होते.पण मी माझे मित्र अक्षय संतोष महाजन,हिमानी कुलकर्णी आणि शुभम जगदिश लोहार यांच्या सोबत रोज आँनलाईन विडियो कॉलद्वारे याची पटकथा लिहिली. आणि मग रावेर परतल्यावर डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 पर्यंत कलाकार शोधून सर्व कलाकारांना 1 महिन्याची अँक्टिंग वर्कशॉप दिली त्यामुळे त्यांना कँमेर-या समोर समोर अँक्टिंग कशी करावी हे समजले.याच मेहनतीचा फायदा आज आम्हाला होतोय.

तसेच चित्रीकरण करतांना मुख्याध्यापक,दिलीप पाटील, सर नगरसेवक अँड.सूरज चौधरी, गोविंद अग्रवाल,अभिषेक दहाळे,मनोज लोहार , केदार सातव, यश सोनार,जयेश वसंत पाटील,यश कोंघे,संकेत मोरगांव,साईकत मुजूमदार भुसावल आणि सर्व रावेर वासियांची व खुप मदत झाली.