जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव आणि भुसावळ मार्गे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. एलटीटी-रक्सौल विशेष रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्यांसह वलसाड आणि उधना-सुबेदारगंज विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची गैरसोय कमी होणार आहे.

मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-रक्सौल (०५५५८) या विशेष गाडीच्या चार अतिरिक्त फेऱ्या वाढवल्या आहेत.रेल्वेच्या दोन अतिरिक्त फेऱ्या जाहीर केल्या आहेत. एलटीटी-रक्सौल (०५५५८) ही विशेष रेल्वेगाडी यापूर्वी १६ जुलैपर्यंत दर गुरुवारी धावत होती. आता २३ व ३० जुलै रोजी या गाडीच्या दोन अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येतील. ०५५५७ रक्सौल-एलटीटी साप्ताहिक विशेष रेल्वे १४ जुलैपर्यंत दर मंगळवारी होती. आता २१ जुलै आणि २८ जुलै रोजी अतिरिक्त फेऱ्या चालतील.

या गाड्यांना मुदतवाढ
रेल्वे जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या ०४१२० वलसाड-सुबेदारगंज ही रेल्वे दर रविवारी धावते. आता ती ३० ऑगस्टपर्यंत धावणार आहे. ०४११९ सुबेदारगंज-वलसाड दर शनिवारी धावते, ही रेल्वे आता २९ ऑगस्टपर्यंत धावेल. मंगळवार, शुक्रवारी धावणारी ०४१५६ उधना-सुबेदारगंज ही रेल्वे १ सप्टेंबरपर्यंत धावेल. तर सोमवार, गुरुवारी धावणारी ०४१५५ सुबेदारगंज-उघना रेल्वे ३१ ऑगस्टपर्यंत आहे.







