जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२२ । श्री संत सखाराम महाराज यात्रा महोत्सवाला सुरवात झाली असुन आज दि १२ रोजी सायंकाळी ८ वाजता रथाची वाडी संस्थान मधुन विधीवत पुजा ह भ प गादीपदी प्रसाद महाराज,आ.अनिल भाईदास पाटील, यांच्या हस्ते करून जागेवरून रथ हलविण्यात आला तर युथ फाउंडेशन तर्फे रथावर फुलांचा वर्षाव करून हिंदू- मुस्लिम एकतेचे दर्शन नागरीकांना दिसले.
यावेळी माजी आ स्मिता वाघ, माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील, अँड ललिता पाटील, डॉ अनिल शिंदे, विनोद कदम , राजेश पाटील, उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव मुख्याधिकारी प्रशांत सरोदे.
तहसीलदार मिलिंद कुमार वाघ,पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, शहर तलाठी गणेश महाजन,तलाठी जितेंद्र जोगी, दिलीपराव देशमुख,अँड रवींद्र देशमुख,भैरवी पलांडे, राकेश पाटील, गौरव पाटील, मुक्तार खाटीक, राहुल गोत्राळ, सनी गायकवाड, ज्ञानेश्वर कुमावत,प्रवीण पाटील,प्रवीण पाठक, देविदास देसले निलेश भांडारकर, धनदाई एज्युकेशनचे चेअरमन प्रा.डी डी खैरनार.
रियाज शेख,विश्वास संतोष पाटील,उमेश सोनार,उदय पाठक,मनोज भांडारकर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व यात्रेकरू भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.