---Advertisement---

धक्कादायक : पैशांसाठी विवाहितेचा छळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । सध्या विवाहितेचे छळ केले जात असल्याचे प्रमाण वाढलं आहे. शहरातील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरहून २० लाख रुपये आणण्यासाठी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहा परेश सोनवणे (वय २२) यांचे जळगाव शहरातील हिराशिवा कॉलनीतील माहेर आहे. यांचा विवाह पुणे येथील परेश मनोहर सोनवणे यांच्याशी रितीरिवाजानुसार २०२१ मध्ये झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून  घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून २० लाख रुपयांची मागणी केली.

विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिचा शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. पैशांसाठी सासरे, सासू, दीर यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. हा त्रास असाह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान विवाहितेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता पती परेश मनोहर सोनवणे, सासरे मनोहर आत्माराम सोनवणे, सासून शर्मीला मनोहर सोनवणे आणि दीर यश मनोहर सोनवणे सर्व रा. पुणे यांच्या वर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक गुलाब माळी करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---