---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

आरोपीच्या सुटकेसाठी पोलिसांवरच हल्ला, डांबूनही ठेवलं, जळगावच्या MP सीमेवरील खळबळजनक घटना

new project (1)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२५ । गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधामध्ये चोपडा ग्रामीण पोलीस गेले असता आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काहीजणांकडून पोलिसांवरच हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी इथे घडली. या हल्ल्यानंतर एका पोलिसाला डांबून ठेवण्यात आले, तर मारहाणीत सहायक पोलिस निरीक्षकासह दोन जण जखमी झाले आहेत.

new project (1)

चार तासांच्या थरारानंतर या पोलिस कर्मचाऱ्याला सुखरुप परत आणण्यास पोलिसांना यश आले आहे. या घटनेने पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांचेच अपहरण होऊन त्यांना डांबून ठेवण्याचा प्रकार होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

---Advertisement---

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर उमर्टी गाव असून एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे गाव सीमेच्या पलीकडील मध्य प्रदेशात आहे. या गावात अवैध शस्त्र बनविण्यात येतात नदीच्या दोन्ही बाजूला गाव आल्यामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेश असे दोघेही राज्याच्या सीमेवर वसलेल्या या गावांमध्ये गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधामध्ये चोपडा ग्रामीण पोलीस गेले असता आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काहीजणांकडून पोलिसांवरच हल्ला करण्यात आला. त्यानंतर, एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन त्यांनी सीमेपलीकडे असलेल्या मध्य प्रदेशातील उमर्टी गावात नेल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा उमर्टी गावाकडे रवाना झाला. तसेच, घटनेसंदर्भात मध्य प्रदेश पोलीस व प्रशासनाशी संपर्क सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली होती.

चार तासांच्या थरारानंतर अपहरण करण्यात आलेल्या शशिकांत पारधी या पोलिस कर्मचाऱ्याची सुटका करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. फरार आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचाऱ्यास आरोपींच्या नातेवाईकांनी अपहरण करून नेल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या उमर्टी गावात घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. या घटने नंतर जळगावसह मध्यप्रदेशातील पोलिसांनी या पोलिस कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी पोलिसांची मोठी कुमक रवाना केली होती. पोलिसांची मोठी कारवाई होण्याच्या भीतीने अपहरणकर्त्यांनी बांधून ठेवण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची सुटका केली आहे.

चोपडा उपजिल्हा रुग्णालयात जखमी पोलीसांवर उपचार सुरु आहेत.
यामध्ये चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पोलीस शिपाई किरण पारधी हे जखमी झाले. जखमी नितनवरे व पोलीस कर्मचारी पारधी यांना रात्री चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरु आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---