---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

चाळीसगाव तालुक्यातील माजी सरपंचाला कारावासाची शिक्षा ; नेमकं प्रकरण काय?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारेच्या माजी सरपंच संघमित्रा नरेंद्र चव्हाण यांना एक महिना कारावासाची शिक्षा चाळीसगाव न्यायालयाने सुनावली आहे. संघमित्रा चव्हाण यांनी दिलेला धनादेश बँकेत न वटल्याने दाखल प्रकरणात ही शिक्षा सुनावली असून फिर्यादीस दोन लाख रुपये देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.

court 1 jpg webp

नेमकं प्रकरण काय?
प्रतिभा अशोक देवरे यांनी संघमित्रा नरेंद्र चव्हाण यांना अडचणीच्या काळी उसनवार म्हणून १ लाख २० हजार रुपये दिले होते. ही रक्कम काही दिवसांनी संघमित्रा नरेंद्र चव्हाण या प्रतिभा अशोक देवरे यांना परत करणार होत्या. संघमित्रा नरेंद्र चव्हाण यांनी १ लाख २० हजारांचा धनादेश प्रतिभा अशोक देवरे यांना दिला.

---Advertisement---

देवरे यांनी धनादेश स्वीकारून बँकेत टाकला असता तो वटला नाही. याविरोधात प्रतिभा देवरे यांनी चाळीसगाव न्यायालयात दाद मागितली. यावर न्यायालयाने संघमित्रा चव्हाण यांना एक महिना कारावासाची शिक्षा सुनावताना ८० हजार नुकसानभरपाईसह धनादेशाची १ लाख २० हजार रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---