जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२५ । आंतरराष्ट्रीत स्तरावर होणाऱ्या घडामोडीमुळे मौल्यवान धातूंमध्ये मोठी वाढ झालीय. भारतीय सराफा बाजारात सोने (Gold Rate) आणि चांदीने (Silver Rate) दरवाढीचा रेकॉर्ड केला होता. यामुळे लग्नसराईसाठी सोन्याचे दागिने बनविणाऱ्या ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले सोन्याची किंमत वाढल्याने ग्राहक मात्र चिंतेत आहेत. Gold Silver Rate Today

गेल्या आठवड्यात देखील सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. अशातच पुन्हा एकदा आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव वाढला आहे. सोमवारी म्हणजेच आज १७ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे.
सराफा बाजारात सोनं 90 हजारांचा दर गाठू शकतो असा अंदाज बांधला जात आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोनं 86,620 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोनं 500 रुपयांनी वाढून 79, 400 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोनं 410 रुपयांनी वाढून 64,970 रुपयांवर पोहोचला आहे.
जळगावमध्ये काय आहेत भाव?
22 कॅरेट सोनं – 79,400 रुपये
24 कॅरेट सोनं – 86,620 रुपये