शिवसेनेतर्फे ‘कोविड लसीकरण आपल्या दारी’ उपक्रम

नोव्हेंबर 1, 2021 6:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२१ । शिवसेना, युवासेना व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व शिवसैनिक विराज कावडीया यांच्या पुढाकाराने ‘कोविड लसीकरण आपल्या दारी’ हा उपक्रम सोमवार दि.१ नोव्हेंबररोजी जळगाव शहरातील तुकारामवाडी, गणेशवाडी परिसरात आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत १८ वर्षा पुढील सर्व व्यक्तींसाठी कोविशिल्ड डोस, पात्र व्यक्तींसाठी दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे.

Shivsena jpg webp

शिबिराचे उदघाटन शिवसेना जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर कुलभूषण पाटील, महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी, ज्योती शिवदे, मंगल बारी, युवासेना विस्तारक किशोर भोसले, विधानसभा क्षेत्र प्रमुख राधेशाम कोगटा, शिवसैनिक विराज कावडीया, युवासेनेचे महानगरप्रमुख विशाल वाणी, अंकित कासार, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी, प्रशांत नाईक, मनोज चौधरी, इबा पटेल, जब्बार शेख, विक्रांत तोरस्कर आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रीतम शिंदे, उमाकांत जाधव, संदीप सूर्यवंशी, लखन मोरे, पवन चव्हाण, प्रपांच पाटील, अजय वंजारी, आर्यन सुरवाडे, अरुण गोसावी, अमीत जगताप, तुषार माळी, संदीप वाणी, देवा झाल्टे यांनी परिश्रम घेतले.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now