Monday, August 8, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

शाळकरी विद्यार्थी मांडणार त्यांच्या मनातील ‘जळगावची छबी’

fist foundation essay
चिन्मय जगतापbyचिन्मय जगताप
July 19, 2022 | 1:22 pm

फिस्ट फाऊंडेशन व इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेन राबविणार निबंध स्पर्धा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२२ । जळगाव शहर, स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित शहर असे ब्रीद वाक्य असलेली जळगाव शहर महानगरपालिका. जळगाव शहराचा विकास रखडला, रस्ते खड्ड्यात हरवले, वृक्षतोड वाढली, कचऱ्याचे ढीग दिसू लागले हे सर्व असताना देखील जळगावचा विकास होईल आणि एक स्वप्नातील जळगाव सत्यात उतरेल अशी आशा लावून जळगाव शहरवासी बसले आहेत. शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या फिस्ट फाऊंडेशन व इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे जळगाव शहरात शालेय स्तरावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील फिस्ट फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे जळगाव शहरातील मराठी, इंग्रजी माध्यमातील शाळेत इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२१ जुलै ते ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत स्पर्धेचा कालावधी असून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी जळगाव : स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित शहर जळगाव तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी My Dream City Jalgaon असा विषय निश्चित करण्यात आला आहे. निबंध लेखन करताना सुंदर हस्ताक्षरात आपल्या शाळेत जमा करावयाचा असून निबंध A4 कागदावर लिहून वर स्वतःचे नाव, पत्ता, वर्ग, संपर्क क्रमांक, स्पर्धेचा विषय स्पष्टपणे लिहिणे आवश्यक आहे.

निबंध लेखनात चांगले प्रशस्त रस्ते, हिरवेगार शहर, मनोरंजन, क्रीडा मैदाने, स्वच्छता, साफसफाई, आरोग्य, शिक्षण व्यवस्था हे मुद्दे समाविष्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना ट्रॉफी, सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र, सहभागी शाळा प्रशासनाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. निबंध स्पर्धेसाठी जळगाव शहरातील विविध शाळा प्रशासनाशी संपर्क करण्यात येत असून त्याव्यतिरिक्त कुणाला स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यास फिस्ट फाऊंडेशनचे सदस्य चेतन वाणी – 9823333119, सकीना लेहरी – 9423913968, कल्पक सांखला – 8055807393, इशिता दोशी – 9325399997, नेहा संघवी – 9028811127 यांच्याशी, लभोनी संकुल, नूतन मराठा महाविद्यालय जवळ, प्रशांत पब्लीकेशनसमोर याठिकाणी किंवा [email protected] यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

DMCA.com Protection Status
in जळगाव शहर, शैक्षणिक
Tags: Essay CompetitionFIST Foundationjalgaon cityjalgaonmunicipalcorporation
SendShareTweet
चिन्मय जगताप

चिन्मय जगताप

पत्रकारिता क्षेत्रात गत ३ वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरात रिऍलिटी चेकचा विशेष अनुभव. मनपा, राजकारण क्षेत्रातील वृत्त संकलन. लाईव्ह, स्टुडिओत अँकरिंग. विशेष मुलाखतींची हाताळणी. विशेष वृत्त लेखन तसेच वृत्त संपादन.

deokar-advt

Copy
Next Post
rupees

डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी पातळीवर, तुमच्या खिशावर काय परिणाम होईल?

crime 2022 06 11T112628.555

धक्कादायक ! राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक, गुन्हा दाखल

indian currency 1

महिन्याला केवळ 1 रुपयाची बचत करा, अन् 2 लाख रुपयांचे सुरक्षा कवच मिळवा

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group