रश्मी शुक्ला यांच्या बदलीनंतर महाराष्ट्राला नवे पोलीस महासंचालक मिळाले; कोण आहेत वाचा..

नोव्हेंबर 5, 2024 2:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२४ । केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केल्यांनतर त्यांच्या जागी आत महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड झाली आहे.

sanjay varma DGP

सध्याते डीजीपी (कायदेशीर आणि तांत्रिक) म्हणून कार्यरत आहेत. रश्मी शुक्ला यांनी निवडणूक आयोगाने बदली केल्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश दिले होते.

यात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या तीन नावांचा समावेश होता. अखेर आज वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now