⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

अबब.. बिग बॉस 16 च्या होस्टसाठी सलमान खानला मिळणार ‘इतके’ कोटी?

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । बिग बॉस 16 ची (Bigg Boss 16) उत्सुकता साऱ्यांनाच आहे. प्रेक्षक आतुरतेने नव्या सीझनची वाट पाहात आहेत. या शोचा प्रीमियर 1 ऑक्टोबर 2022 रोजी कलर्स टीव्हीवर होईल. या शोबद्दल बरेच अनुमान काढले जात आहेत. परंतु त्याच वेळी, बिग बॉस 16 च्या होस्ट करण्यासाठी सलमान खानची नेमकी किती फिस असेल याबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच सलमान या सीझनसाठी 1000 कोटी घेणार असल्याची बातमी समोर आली होती, परंतु नुकत्याच आलेल्या एका मीडिया रिपोर्टमध्ये त्याची फी आणखी कमी केल्याचा दावा केला जात आहे.

OTT मुळे बिग बॉसचे नुकसान?
‘मिड डे’ मधील एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की ‘बिग बॉस’ यापुढे OTT वर पुनरागमन करणार नाही. कोरोनाच्या काळात ओटीटीवर आलेल्या ‘बिग बॉस’ने गेल्या वेळी काही खास कामगिरी केली नाही आणि त्यामुळे शोला फारसा फायदा होऊ शकला नाही. इतके नुकसान झाल्यानंतर आता प्रायोजकांनी हात खेचले आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, यामुळे सलमान खानने आपली फी कमी करण्याचा विचार केला आहे. यावेळी तो आपला कार्यभार वाढवणार नाही.

सलमानची फी कापली जाऊ शकते
सलमान खानच्या फीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी सलमान खानने ‘बिग बॉस 15’ साठी 350 कोटी रुपये घेतले होते आणि जर शोच्या निर्मात्यांनी हाच दृष्टिकोन ठेवला तर यावेळी सलमान खान मागील वेळेपेक्षा कमी फी घेऊ शकतो. मात्र स्वत: सलमान खानने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

हे स्पर्धक असू शकतात
‘बिग बॉस 16’ च्या स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी ‘लॉकअप’ रिअॅलिटी शोचा विजेता मुनव्वर फारुकी, फैजल शेख, ‘भाभी जी घर पर हैं’ फेम शुभांगी अत्रे, ‘इमली’ फेम फहमान खान, बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ, कनिका मान यासारख्या सेलिब्रिटींना ‘बिग बॉस 16’ साठी अप्रोच करण्यात आले आहे. तथापि, शोच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.