Saturday, May 21, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

३०० फूट खोल दरीत कोसळला तांदळाचा ट्र्क, उडी मारल्याने चालक, क्लीनर बचावले

accident kannad ghat
चेतन वाणीbyचेतन वाणी
February 17, 2022 | 10:54 am

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । कन्नड घाटात मंगळवारी सकाळी एक मोठा अपघात झाला असून प्रसंगावधान राखल्याने चालक आणि क्लिनर बचावले आहे. धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२‎ वरील कन्नड घाटात औरंगाबादकडून, धुळ्याकडे जाणाऱ्या तांदळाच्या ट्रक घाटातील मल्हार गडाजवळील मेणबत्ती पॉइंटजवळ ब्रेक फेल झाल्याने ३०० फूट खोल दरीत कोसळला. ट्रक दरीत काेसळण्यापर्वी चालकाने व ट्रकच्या क्लीनरने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने सुदैवाने जिवितहानी टळली. मात्र, अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले, तसेच घाटातील वाहतूक सुरळीत केली.

मंगळवारी सकाळी तांदळाचा ट्रक क्रमांक ए.पी.२९-टी.व्ही.११६६ हा औरंगाबादकडून धुळ्याच्या दिशेने जात हाेता. ट्रक कन्नड घाटात युटर्नजवळ पाेहचल्यावर १०.३० वाजेच्या सुमारास ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. घाटातील मेणबत्ती पॉइंटजवळ चालकाने ट्रकवर नियत्रंण मिळवण्याचा प्रयत्न केला. पंरतु यश न आल्याने चालक व क्लीनरने वेळीच ट्रकमधून उडी घेतली, त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे.

महामार्ग पाेलिस सकाळी घाटात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना एका दुचाकी चालकाने अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच महामार्ग पाेलिस केंद्राचे सहाय्यक निरीक्षक भागवत पाटील, उपनिरीक्षक सुनील पवार, हवालदार शामकांत साेनवणे, धनराज पाटील व अन्य पाेलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे त्यांना ट्रक दरीत कोसळलेला दिसून आला. तर चालक व क्लीनर भेदरलेल्या अवस्थेत आढळले. पाेलिसांनी त्यांना धीर दिला, तसेच वाहतूक सुरळीत केली.

हे देखील वाचा :

  • दुर्दैवी : वीज पडून ३३ जणांचा मृत्यू, मोदींनी केले ट्वीट..
  • वाळूचे ट्रॅक्टर उलटले : तिघे जागीच ठार, दोन चुलत भावांचा समावेश
  • तिचा काळ आला होता… मात्र कुत्र्याने वाचवला जीव
  • जळगावात फर्निचर दुकान खाक, १२ बंबांनी विझवली आग, लाखोंचे नुकसान
  • तांबापुरा, मासुमवाडीत वाद : दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक, ५ जखमी

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in घात-अपघात, चाळीसगाव, ब्रेकिंग
Tags: accidentChalisgaonhighwaypolicepolice
SendShareTweet
चेतन वाणी

चेतन वाणी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
India Post Recruitment 2022

10वी पाससाठी भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी, तपशील जाणून घ्या आणि अर्ज करा

vishnu chaudhari suiside

देवदर्शन, ग्रामस्थांच्या भेटीगाठीनंतर शेतकऱ्याने घेतला गळफास

ajay ingle succied

लग्नासाठी तरुणीकडून तगादा, तरुणाने घेतली पूर्णा नदीत उडी

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.