२८ जूनला जळगावातील ‘या’ सेवा राहणार बंद! महाटीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

जून 25, 2026 5:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी जळगाव शहरातील ३० परीक्षा केंद्रांवर सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच “कॉपीमुक्त अभियान” प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

restraining order

या परीक्षेसाठी जळगाव शहरात ३० परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात गैरप्रकार होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार, दि. २८ जून २०२६ रोजी पेपर सुरू झाल्यापासून ते पेपर समाप्त होईपर्यंत (सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.००) जळगाव शहरातील सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, हा आदेश परीक्षार्थी, नियुक्त अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड यांना लागू राहणार नाही.

तसेच, सर्व परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने संबंधित कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हा आदेश संबंधितांना वैयक्तिकरित्या नोटीस बजावण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध नसल्याने भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ नुसार एकतर्फी स्वरूपात निर्गमित करण्यात आला असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now