⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

प्राध्यापकांसाठी‎ रिपोर्ट रायटिंग युजिंग लॅटेक्स‎ शॉर्टटर्म ट्रेनिंग प्रोग्राम ‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२। ‎येथील केसीई अभियांत्रिकी आणि‎ व्यवस्थापन महाविद्यालयाच्या‎ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग‎ विभागामार्फत प्राध्यापकांसाठी‎ रिपोर्ट रायटिंग युजिंग लॅटेक्स‎ शॉर्टटर्म ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात ‎ आला होता.

यावेळी ५० प्राध्यापकांनी‎ या प्रोग्राममध्ये सहभाग नोंदवला. कार्यशाळा १८ ते‎ २२ एप्रिलदरम्यान घेण्यात आली.‎ कार्यशाळेत प्रा. अविनाश‎ सूर्यवंशी यांनी लॅटेक्स‎ सॉफ्टवेअरचा उपयोग कसा‎ करावा? या विषयावर मार्गदर्शन‎ केले. लॅटेक्स सॉफ्टवेअरचा उपयोग‎ करून अंतिम वर्षाचा प्रोजेक्ट रिपोर्ट‎ कसा तयार करावा याबद्दलची‎ माहिती प्राध्यापकांना दिली.‎ कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी‎ प्राचार्य डॉ. संजय सुगंधी उपस्थित‎ होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा.‎ अविनाश सूर्यवंशी, प्रा. पुजा नवाल,‎ प्रा. हर्षा तळेले यांनी केले.‎ यशस्वीतेसाठी प्रा. संजय दहाड, प्रा.‎ डॉ. प्रज्ञा विखार, विभागप्रमुख प्रा.‎ मिनल कोल्हे आदींनी परिश्रम घेतले.‎