जी.एच.रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “रेड कलर डे” साजरा

जुलै 5, 2022 11:13 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । जी.एच.रायसोनी पब्लिक स्कूल मध्ये “रेड कलर डे” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रायसोनी पब्लिक स्कूलचे पहिली ते आठवीचे विद्यार्थी व प्ले ग्रुप ते सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

redday

या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षिक लाल रंगाचे कपडे परिधान करून आले होते, लाल रंगाच्या पोशाखात स्कूल मध्ये दाखल झालेली सर्व लहान मुलं सगळ्यांच्या मनाला समोहित करत होती. यावेळी विद्यार्थ्यांना लाल रंगाची ओळख व्हावी या अनुषंगाने रेड कलर डेचे औचित्य साधून पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन द्वारे विध्यार्थ्यांना लाल रंगाची माहिती देण्यात आली तसेच लाल रंगांचे विविध वस्तूं टेबलावर मांडण्यात आल्या व मयुरी वालेचा व रिंकू लुल्ला या शिक्षकांनी या वस्तूंचा आधार घेत विद्यार्थ्यांना लाल रंगाची माहिती सांगितली लाल रंगाचे विविध मनोरंजक गोष्टी सांगितल्या.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी वैज्ञानिक युगात लाल रंग माहितीची प्रतीक कसे आहे हे मुलांना स्पष्ट केले तसेच लाल रंगाद्वारे अज्ञात धोक्याची माहिती कशी दिली जाते. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी लाल रंगाचा वापर कसा केला जातो हेही त्यांनी आपला मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या कार्यक्रमासाठी तस्नीम टकंरवाला, नेहा चिंचोले, आरती पाटील, निधी खडके, सोनिया शर्मा, नेहा शिंपी, दिपाली कुलकर्णी यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now