
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरीच्या शोधात असलेल्या जळगावातील तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. शहरातील SMR Electricals येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, 10वी, 12वी उत्तीर्ण तसेच पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
SMR Electricals कडून हेल्पर पदासाठी 6 जागा असून त्यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. ऑर्डर प्रोसेसिंग अँड चेकिंग बॉय पदासाठी 5 जागा असून 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
याशिवाय कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी 2 जागा असून या पदासाठी संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आहे. अकाउंटंट आणि स्टॉक मॅनेजर पदासाठी प्रत्येकी 2 जागा, तर सेल्समन पदासाठी 5 जागा उपलब्ध आहेत. या तीनही पदांसाठी पदवीधर उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना आपला रिझ्युमे सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुलाखतीचे ठिकाण :
SMR Electricals, 43/2बी, विसनजी नगर, महालक्ष्मी स्वीट्ससमोर, जळगाव.
संपर्क : 9049068000





