
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. असम रायफल्समध्ये विविध पदांच्या एकूण ३५४ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये १०वी, १२वी उत्तीर्ण तसेच ITI, डिप्लोमा आणि संबंधित पदवीधारक उमेदवारांना पदानुसार अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ डिसेंबर २०२६ आहे. Assam Rifles Recruitment 2026
कोणत्या पदासाठी किती जागा?
- वॉरंट ऑफिसर (सायफर) – १२४
- रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) – ३२
- रायफलमन (लाइनमन फील्ड) – २१
- रायफलमन (आर्मरर) – २९
- रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) – १०
- रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक) – १३
- रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल) – २२
- हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेअरर/मेकॅनिक) – ६
- रायफलमन (मेटलस्मिथ) – १९
- रायफलमन (अपहोल्स्टर) – ३
- रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल – १६
- रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक/फिटर) – २३
- रायफलमन (वेल्डर) – २
- वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन) – २
- वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन) – १
- वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट) – २
- रायफलमन (मेसन) – २९
शैक्षणिक पात्रता काय?
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अनेक पदे उपलब्ध असून काही पदांसाठी संबंधित ट्रेडमधील ITI आवश्यक आहे. वॉरंट ऑफिसर (सायफर) पदासाठी १२वी उत्तीर्णसोबत रेडिओ अँड टेलिव्हिजन/इलेक्ट्रॉनिक्समधील ITI किंवा इलेक्ट्रॉनिक्स/IT पदवी आवश्यक आहे.
तर काही पदांसाठी १२वी उत्तीर्ण तसेच इन्स्ट्रुमेंटेशन, आर्किटेक्चरल असिस्टंटशिप, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, फिजिओथेरपी आदी संबंधित डिप्लोमा आवश्यक आहे.
वयोमर्यादा
१ जुलै २०२६ रोजी वयाची गणना केली जाणार आहे. पदानुसार वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे किंवा १८ ते २५ वर्षे आहे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची वयामध्ये सवलत मिळणार आहे.
अर्ज शुल्क
GEN आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क आहे. तर SC, ST, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या तारखा
असम रायफल्सच्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ डिसेंबर २०२६ आहे. भरती मेळावा १८ जानेवारी २०२७ पासून सुरू होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीचे ठिकाण मिळू शकते.
१०वी, १२वी तसेच ITI आणि डिप्लोमा पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीत पदनिहाय पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासून अर्ज करावा.





