खुशखबर ! सलग तिसऱ्यांदा RBI कडून रेपो दरात कपात, कर्जाचा EMI होणार कमी

जून 6, 2025 11:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२५ । कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. आजच्या कपातीमुळे रेपो दर आता ५.५ टक्क्यांवर आला आहे.

repo rate

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे होम लोन, कार लोन स्वस्त होणार आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली आहे. याआधीही दोनदा रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली होती.

कर्जाचा हप्ता कमी होणार
रिझर्व्ह बँकेने याआधी पतधोरण बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. आता ५० बेसिस पॉइंट्सने ही कपात केली आहे.जर तुम्ही २० लाखांचे लोन घेतले असेल तर त्याच्या व्याजदरात कपात होणार आहे. जर तुम्ही हे लोन २० वर्षांसाठी ९ टक्के व्याजाने घेतले असेल तर सध्या त्याचा हप्ता १७,९९५ रुपये असेल. आता रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर हा हप्ता १७,३५६ रुपये होईल.

रेपो रेट म्हणजे नक्की काय? (What Is Repo Rate)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट निश्चित करते. या रेपो रेटवरच आधारित प्रत्येक बँक आपल्या कर्जाचे व्याजदर ठरवते. सर्व बँकांना या रेपो रेटचं पालन करावे लागते. त्यानुसारच त्यांना कर्जावरील व्याजदर ठरवता येतो. जर रेपो रेट कमी झाला तर कर्जावरील व्याजदरदेखील कमी होणार आहे. जर रेपो रेटमध्ये वाढ झाली तर कर्जावरील हप्ता वाढतो. म्हणजेच व्याजदर वाढते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment