raver news-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर येथे तालुका विधी सेवा समितीतर्फे काल दि. 12 सप्टेंबर रोजी मानसिक रुग्ण व मानसिक अपंगत्व/ व्यंग या विषयावर मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी मानसिक दृष्ट्या दुर्बल घटकांना विधी सेवा प्राधिकरणा मार्फत पुरविल्या जाणार्या सेवा तसेच Mental Helth Act 1987 यावर मार्गदर्शन करण्यात आले.

महाराष्ट्रराज्य विधी सेवा प्राधिकरण व उच्चन्यायालय,मुंबई च्या दिनदर्शिका अन्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांचे मार्गदर्शना नुसार तालुका विधी सेवा समिती,रावेर च्या वतीने दिवाणी व फौजदारी न्यायालय,रावेर येथे NALSA(Legal Service to the Mentally ill and Mentally Disabled Person), Siemens, 2015 मानसिक दृष्ट्या दुर्बल घटकांना NALSA कडून पुरवल्या जाणार्या सेवा या विषयावर दिवाणी व फौजदारी न्यायालय,रावेर येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे अध्यक्षस्थानी न्या.प्रविण पी. यादव (तालुका विधी सेवा समिती रावेर तथा दिवाणी न्यायाधीश व फौजदारी न्यायालय रावेर) यांनी मानसिक दृष्ट्या दुर्बल घटकांना विधी सेवा प्राधिकरणा मार्फत पुरविल्या जाणार्या सेवा तसेच Mental Helth Act 1987 यावर मार्गदर्शन केले, प्रमुख वक्ते डॉ. योगेश राणे ग्रामीण रुग्णालय रावेर यांनी Mentally ill व Mentally Disabled Person यांमधील फरक समजाऊन त्यावर सविस्तर माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिपक तायडे, व प्रास्ताविक अँड. रमाकांत महाजन तर आभार अँड. जगदीश महाजन यांनी केले. तसेच कार्यक्रमाला तालुका विधी सेवा समिती चे समांतर विधी सहाय्यक राजेंद्र अटकाळे, बालकृष्ण पाटील, दयाराम मानणारे गुरुजी यांचे सह वकील, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












