Chalisagaon : आधी लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार, नंतर तरुणीसोबत घडलं भयंकर

जून 16, 2023 4:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२३ । लग्नाच्या आमिषाने मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अशातच चाळीसगावमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. 20 वर्षीय तरुणीवर लग्नाच्या आमिष दाखवून अत्याचार केला.

crime jpg webp

तरुणाने या अत्याचाराचे व्हिडीओ तयार करून ते व्हायरल करून बदनामी देण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या प्रकरणी फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तरुणीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित विष्णू उर्फ विश्वनाथ संतोष पवार (चाळीसगाव तालुका) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमकी काय आहे घटना?
शहरापासून काही अंतरावर 20 वर्षीय पीडीता परीवारासह वास्तव्यास असून संशयित व पीडीतेत ओळख निर्माण झाल्यानंतर संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला व त्याबाबत फोटो काढून व्हिडिओ चित्रीकरण केले व नंतर मी बोलावल्यानंतर तु आली नाही तर हे व्हिडिओ व फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देत वारंवार अत्याचार केला तसेच लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तरुणीला शिविगाळ करीत मारहाण करण्यात आली व लग्न करणार नाही, असेदेखील आरोपीने सांगितल्याने फसवणुकीची खात्री होताच तरुणीने पोलिसात तक्रार नोंदवली. ही घटना जून 2019 ते 13 मार्च 2023 दरम्यान वेळोवेळी घडली. तपास सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now