अखेर ‘तारक मेहता…’मध्ये नवी दयाबेन येणार; दिशा वकानीची जागा ‘ही’ अभिनेत्री घेणार?

जून 18, 2022 4:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका आणि त्यातील सर्वच पात्रे घरघरात लोकप्रिय झाली आहे. यातील प्रेक्षकांच्या सर्वात आवडत्या पात्रांपैकी एक दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीने (Disha Vakani) गेल्या चार वर्षांपासून ती मालिकेतून गायब आहे. चाहते दयाबेनला मालिकेत पुन्हा एकदा पाहण्यासाठी आतुर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दिशा मालिकेत पुनरागमन करणार अशी चर्चा सुरु होती.

tarak mehta jpg webp

मात्र, अशातच एक बातमी समोर आलीय. ती म्हणजे या शोमध्ये दयाबेनचं पुनरागमन होणार आहे. परंतु आता दयाबेनच्या भूमिकेत दिशा वकानी नाही तर नवीन अभिनेत्री ही भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री राखी विजान असे नवीन दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक दयाबेनला परत आणण्याची मागणी करत होते. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी ऑडिशननंतर एका अभिनेत्रीला शॉर्टलिस्टही केल्याचं सांगितलं जात आहे.

image 20

ETimes च्या रिपोर्टनुसार, 90 च्या दशकातील प्रसिद्ध टीव्ही शो ‘हम पांच’मध्ये स्वीटी माथूरची भूमिका साकारणारी अभिनेत्री राखी विजान (Rakhi Vijan) दयाबेनची जागा घेऊ शकते. राखी ‘तारक मेहता का’ शोमध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. राखी एक उत्तम अभिनेत्री आहे आणि तिची कॉमिक टायमिंगही जबरदस्त आहे. ‘राखी देख भाई देख’, ‘बनेगी अपनी बात’ या शोमध्येसुद्धा दिसली आहे. ती टीव्हीचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा भागही आहे. इतकंच नव्हे तर तिने ‘गोलमाल रिटर्न्स’ या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now