जळगाव शहरासह परिसरात मुसळधार पावसाने दैना ; रस्ते झाले जलमय

सप्टेंबर 16, 2022 1:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. आज शुक्रवारी जळगाव शहरासह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी रस्तेही जलमय झालेले दिसून आले. दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी पुढचे काही दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

rain 1 jpg webp

कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकतानाच अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा झाल्याने राज्यात गेल्या आठवड्यात अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

जळगाव जिल्ह्यात देखील गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरूच आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज शुक्रवारी जळगाव शहरासह परिसरात दुपारी १ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचलेले दिसून आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now