⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

विद्यार्थ्यांसाठी रॅगिंग प्रतिबंधक समुपदेशन कार्यशाळा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । येथील शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यार्थी विकास विभागांतर्गत रॅगिंग प्रतिबंधक समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यशाळेचे उद्घाटन सिनेट सदस्य डॉ. के.जी. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.बी. वाघुळदे हे होते. व्यासपीठावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रियंका बऱ्हाटे, डॉ. राजकुमार लोखंडे उपस्थित होते. डॉ. कोल्हे यांनी रॅगिंगविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ. वाघुळदे यांनी महाविद्यालयीन स्तरावर रॅगिंग प्रतिबंधक कमिटी स्थापन करण्यात येते. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी रॅगिंगला बळी पडत असतील तर त्यांनी या कमिटीकडे आपली तक्रार नोंदवावी. प्रथम सत्रात रॅगिंग प्रतिबंधासाठी डॉ. श्याम सोनवणे यांनी व्याख्यान दिले. अँड. सीमा जाधव यांनी रॅगिंग प्रतिबंधक कायदे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात तृतीय व्याख्यान मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कीर्ती देशमुख यांचे रॅगिंग प्रतिबंधक समुपदेशन या विषयावर झाले. कार्यशाळेला महाविद्यालयातील ११० विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. प्रियंका बऱ्हाटे यांनी केले. प्रा. देवयानी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.