प्रा. डॉ. प्रेमजीत जाधव यांना पीएच.डी प्रदान

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे मू. जे. महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.प्रेमजीत गजानन वाघ यांना भौतिकशास्त्र विषयात नुकतीच पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.

त्यांनी फोटोकंडक्टिव्ह सेल विषयावर संशोधन केले आहे. त्यांना अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे डॉ. दिलीप भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. प्रेमजीत जाधव यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.