---Advertisement---
बातम्या

अखेर बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’ चा टीझर रिलीज ; ‘या’ तारखेला थिएटरमध्ये रिलीज होणार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२४ । ज्या क्षणाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो आज क्षण आला. अल्लू अर्जूनच्या बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २: द रुल’चा टीझर रिलीज झालेला आहे. अल्लू अर्जुन आज ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्याच्या वाढदिवशी टीझर प्रदर्शित करण्यात आलेला आहे. निर्मात्यांनी टीझरमध्ये, चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा केली आहे.

pushpa 2 jpg webp

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २: द रुल’चा टीझर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. पायात घुंगरू, डोळ्यात आग, हातात त्रिशूल आणि अर्धनारीच्या लूकमध्ये ‘पुष्पा’च्या ॲक्शन अवताराने सगळ्यांचेच लक्ष वेधलेय. त्यासोबतच अल्लू अर्जून हातात त्रिशूळ आणि शंख घेऊन तांडव करतानाही पाहायला मिळत आहे.

---Advertisement---
Pushpa 2 The Rule Teaser | Allu Arjun | Sukumar | Rashmika Mandanna | Fahadh Faasil | DSP

चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. टीझरने सर्वांचेच लक्ष वेधले असून चित्रपटाच्या सिक्वेलची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. ‘पुष्पा 2’चा टीझर पाहून ‘फ्लावर नहीं फायर है’ अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---