जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंजाब अँड सिंध बँकेने लोकल बँक ऑफिसर (LBO) पदाच्या तब्बल १,००० रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहे. Punjab And Sind Bank Bharti 2026

भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार पीएसबीच्या अधिकृत वेबसाइट punjabandsindbank.co.in वर जाऊन किंवा या पेजवर दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज भरू शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२६ आहे. Punjab And Sind Bank Recruitment 2026

पात्रतेचे निकष काय आहेत?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांना कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँक/प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी संवर्गात १८ महिन्यांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेदवारांचे वय किमान २० ते ३० वर्षे असावे, म्हणजेच त्यांचा जन्म २ मार्च १९९६ ते १ मार्च २००६ दरम्यान झालेला असावा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. १ मार्च २०२६ लक्षात घेऊन वयाची गणना केली जाईल.
अर्ज शुल्क
सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना ₹850 (अधिक कर आणि पेमेंट गेटवे शुल्क) भरावे लागतील. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना ₹100 (अधिक कर आणि पेमेंट गेटवे शुल्क) भरावे लागतील.
निवड पद्धत आणि पगार :
पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, छाननी, वैयक्तिक मुलाखत, स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी, अंतिम गुणवत्ता यादी आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹४८,४८० ते ₹८५,९२० पर्यंत वेतन, तसेच इतर लाभ आणि भत्ते मिळतील.










