ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! सोन्याचा भाव 18000 रुपयांनी घसरला, आता प्रति १० ग्रॅमचा भाव किती?

एप्रिल 6, 2026 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२६ । मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आज सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतींमध्ये घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. १० तोळे सोने दरात तब्बल १८,००० रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

gold silver

जळगाव शहरातील सुवर्णबाजारातही आज सोन्याच्या दरात घट दिसून आली. त्यामुळे लग्नसराईसाठी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा उत्साह वाढला असून बाजारात पुन्हा हालचाल दिसू लागली आहे.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव सराफ बाजारात आज सकाळी बाजार उघडल्यानंतर २४ कॅरेट सोन्याच्या दरात १,८०० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे सोन्याचा दर १,४९,१३० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच घसरण झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १,६५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३६,७०० रुपये मोजावे लागणार आहे. २४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,३५० रुपयांनी घसरण होऊन ते १,११,८५० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now