जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महानदी कोलफील्ड्स लिमिटेड (MCL) ने विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. एकूण 667 पदांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना भरघोस पगाराची नोकरी मिळविण्याची संधी आहे. MCL Bharti 2026

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://www.mahanadicoal.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2026 (रात्र 11:50 वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे. Mahanadi Coalfields Limited Recruitment 2026

रिक्त पदाचा तपशील :
1) ज्युनियर ओव्हरमन T&S – 192 पदे
2) माइनिंग सिरदार T&S – 448 पदे
3) सर्व्हेअर – 24 पदे
4) ट्रान्सलेटर (Tr.) OL क्लेरिकल ग्रेड III – 01 पद
5) टेक्निशियन (पॅथोलॉजी) Tr. T&S ग्रेड-C – 02 पदे
शैक्षणिक पात्रता
ज्युनियर ओव्हरमन T&S: माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा, ओवरमन प्रमाणपत्र, प्रथमोपचार प्रमाणपत्र, गॅस परिक्षण प्रमाणपत्र
माइनिंग सिरदार T&S: 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग डिप्लोमा/पदवी, माइनिंग सिरदार प्रमाणपत्र, प्रथमोपचार प्रमाणपत्र, गॅस परिक्षण प्रमाणपत्र
सर्व्हेअर: 10वी/माइनिंग/सर्वेइंग डिप्लोमा/पदवी + सर्व्हे प्रमाणपत्र
ट्रान्सलेटर: BA (हिंदी/इंग्रजी), हिंदी ट्रांसलेशन डिप्लोमा
टेक्निशियन (पॅथोलॉजी): पॅथोलॉजी डिप्लोमा
वयोमर्यादा
18 ते 30 वर्षे (06 एप्रिल 2026 रोजी)
SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट
परीक्षा फी
जनरल/OBC/EWS: ₹1180/-
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
इतका पगार मिळेल?
ज्युनियर ओव्हरमन T&S – ₹47,330/-
माइनिंग सिरदार T&S – ₹47,330/-
सर्व्हेअर – ₹51,103/-
ट्रान्सलेटर (Tr.) OL – ₹41,966/-
टेक्निशियन (पॅथोलॉजी) – ₹47,330/-
महत्त्वाची माहिती
नोकरी ठिकाण: ओडिशा
परीक्षा तारीख: नंतर जाहीर केली जाईल












