10वी पास तरुणांसाठी खुशखबर! सशस्त्र सीमा बलात 827 पदांसाठी भरती, 69100 पगार मिळेल..

मार्च 23, 2026 1:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरी मिळविण्यासाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सशस्त्र सीमा बल (SSB) ने कॉन्स्टेबल पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 827 पदे भरली जातील. विशेष 10वी पास तरुणांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी असणार आहे. SSB Constable Recruitment 2026

SSC Bharti

इच्छुक उमेदवार ssb.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल 2026 ही निश्चित करण्यात आलीय. SSB Constable Bharti 2026

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी)35
2कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)553
3कॉन्स्टेबल (गार्डनर)41
4कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)05
5कॉन्स्टेबल (कॉब्लर)25
6कॉन्स्टेबल (टेलर)41
7कॉन्स्टेबल (वॉशरमन)74
8कॉन्स्टेबल (बार्बर)43
9कॉन्स्टेबल (वेटर)03
10कॉन्स्टेबल (कारपेंटर)07
11कॉन्स्टेबल (नर्सिंग ऑर्डर्ली)01

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.3 ते 10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ITI डिप्लोमा
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ‘सेंट जॉन्स ॲम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन’ (St. John’s Ambulance Organisation) किंवा ‘रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया’ कडील प्रथमोपचार (First Aid) प्रमाणपत्र अभ्यासक्रम; (iii) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या, किमान 50 बेडची क्षमता असलेल्या रुग्णालय किंवा संस्थेमध्ये ‘नर्सिंग ऑर्डरली’ (Nursing Orderly) म्हणून किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव.

वयोमर्यादा सामान्यतः १८ ते २३ वर्षे किंवा १८ ते २७ वर्षे ठेवण्यात येते.

इतका पगार मिळेल?

निवड झालेल्या उमेदवारांना वेतन स्तर 3 (Pay Level 3) नुसार पगार मिळेल. सुरुवातीचा पगार ₹21,700 ते ₹69,100 पर्यंत असेल. इतर भत्ते देखील दिले जातील.

अर्ज शुल्क

सर्वसाधारण, EWS, OBC: ₹100
SC, ST, माजी सैनिक आणि महिला उमेदवार: कोणतेही शुल्क नाही

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी निवड अनेक टप्प्यांमध्ये घेतली जाईल:
शारीरिक कार्यक्षमता आणि मानक चाचणी
लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी (ट्रेड्समन आणि ड्रायव्हर्ससाठी)
कागदपत्र पडताळणी
वैद्यकीय चाचणी
लेखी परीक्षेत 100 प्रश्न असतील, एकूण 100 गुण असतील. परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे असेल आणि नकारात्मक गुणदान (निगेटिव्ह मार्किंग) असेल. सामान्य ज्ञान, तर्कशास्त्र, गणित आणि भाषा यांमधून प्रश्न विचारले जातील.

अर्ज कसा करावा

उमेदवार खालील पायऱ्यांचे अनुसरण करून अर्ज करू शकतात:
सर्वप्रथम, ssb.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
कॉन्स्टेबल ट्रेड्समन/ड्रायव्हर अर्ज करा (Apply) या लिंकवर क्लिक करा.
तुमच्या ईमेल पत्त्यासह आणि मोबाइल नंबरसह नोंदणी करा.
लॉगिन करा आणि अर्ज भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क ऑनलाइन भरा. फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा किंवा डाउनलोड करा.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now