व्यावसायिक गॅससाठी आता हमीपत्र अनिवार्य; प्रमाणपत्रात द्यावी लागणार ‘ही’ माहिती?

एप्रिल 6, 2026 11:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी सिलिंडरची टंचाई निर्माण झाली असून अनेक ठिकाणी गॅससाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. गॅस सिलिंडर टंचाईमुळे अनेक उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. याच परिस्थितीत गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी सरकार आणि गॅस कंपन्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

gas

आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर केवळ अधिकृत कारणांसाठीच व्हावा यासाठी ‘एंड यूज सर्टिफिकेट’ (EUC) सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गॅस वितरकांकडून हे प्रमाणपत्र व्यावसायिक ग्राहकांकडून भरून घेतले जात असून त्यानंतरच गॅस पुरवठा करण्यात येणार आहे.

अनेकदा व्यावसायिक गॅसचा वापर घरगुती कामांसाठी किंवा अनधिकृत ठिकाणी केला जातो. हे टाळण्यासाठी गॅस कंपन्यांनी आता संबंधित ग्राहकांकडून लेखी हमीपत्र घेण्यास सुरुवात केली आहे. या अर्जामध्ये ग्राहकाला आपल्या आस्थापनेचे नाव, पत्ता, जीएसटी क्रमांक आणि गॅस वापराचे नेमके कारण स्पष्ट करावे लागणार आहे.

प्राधान्य क्रमानुसार, जळगाव शहरातील रुग्णालये व शासकीय वसतिगृहे यांना एलपीजी सिलिंडरचा पुरवठा होत आहे. पण, आता व्यावसायिक ग्राहकांसाठी देखील व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्याआधी गॅस वितरण कंपन्यांनी ग्राहकांकडून ईयूसी प्रमाणपत्र भरून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे प्रमाणपत्र कंपनीकडे पाठविले जात असून, त्यात दर्शविलेल्या मागणीनुसार येत्या दिवसांत व्यावसायिक गॅसचा

प्रमाणपत्रात ही माहिती द्यावी लागेल?

वापराचा उद्देश : गॅसचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग, रुग्णालय की वसतिगृहासाठी केला जात आहे, याची स्पष्ट नोंद करावी लागेल.
वापर मर्यादा : एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या काळात किती गॅस वापरला आणि पुढे किती गरज आहे याची माहिती ग्राहकाला द्यावी लागेल.
हमीपत्र : गॅसचा पुरवठा तिसऱ्या व्यक्तीला केला जाणार नाही किंवा त्याचा कोणताही गैरवापर होणार नाही, अशी लेखी हमी ग्राहकाला द्यावी लागेल.
दंडनीय कारवाई: जर ग्राहकाने प्रमाणपत्रात पुरविलेली माहिती चुकीची आढळली किंवा गॅसचा गैरवापर झाला असल्याचे आढळून आले तर गॅस पुरवठा खंडित करण्यासोबतच कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now