ECHS भुसावळ अंतर्गत विविध पदांकरिता भरती, पगार 36500 पर्यंत, 5 एप्रिलपर्यंत अर्ज करा

मार्च 18, 2026 5:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) भुसावळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून स्थानिक उमेदवारांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ECHS Bhusawal Bharti 2026

echs bhusawal

या भरतीद्वारे फार्मासिस्ट, दंतवैद्यकीय सहाय्यक, लिपिक आणि शिपाई या पदांच्या एकूण 4 जागा भरण्यात येणार आहेत. लक्ष्यात असू द्या या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आलीय. त्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा. ECHS Bhusawal Recruitment 2026

भरतीसाठी पात्रता काय?
फार्मासिस्ट :-
बी फार्म किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांसह १०+२ (किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव)
दंतवैद्यकीय ए/टी/एच :– दंत स्वच्छता (Dental Hygiene) विषयातील पदविकाधारक / वर्ग १ दंत स्वच्छता (Class 1 DH) / DORA अभ्यासक्रम (सशस्त्र दले) (किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव)
लिपिक :- पदवीधर / प्रथम श्रेणी लिपिकीय व्यापार (सशस्त्र दले) (किमान ५ वर्षांचा अनुभव)
शिपाई :– सशस्त्र दलांसाठी इयत्ता ८ वी किंवा GD ट्रेड (किमान ५ वर्षांचा अनुभव)

पदे आणि वेतन:
फार्मासिस्ट – ₹36,500/-
दंतवैद्यकीय ए/टी/एच – ₹36,500/-
लिपिक – ₹29,200/-
शिपाई – ₹21,800/-

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. सर्व पात्रता अटी, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज नाकारले जाणार आहेत. अर्ज सादर करण्याच्या सूचना आणि आवश्यक माहिती echs.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now