ITI पास ते पदवीधर तरुणांना सरकारी नोकरीची संधी; विविध पदांसाठी मोठी पदभरती

एप्रिल 4, 2026 3:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । शिक्षण पूर्ण झाल्यावर, प्रत्येक तरुणाचे सुरक्षित भविष्यासाठी चांगल्या नोकरीचे स्वप्न असते. तुम्हालाही सरकारी नोकरी हवी असेल, तर तुम्ही नोटा छापणाऱ्या कंपनीतील भरतीसाठी अर्ज करू शकता. भारत सरकार मिंट मध्ये विविध पदांसाठी मोठी भरतीची प्रक्रिया सुरु आहे. India Government Mint Bharti 2026

IGM Bharti

या भरतीद्वारे एकूण 94 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ITI पास ते पदवीधर तरुण या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार igmnoida.spmcil.com या वेबसाईट जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2026 (03:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. India Government Mint Recruitment 2026

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) सुपरवायझर (Assay), S-1 लेव्हल 02
2) सुपरवायझर (T.O. मेकॅनिकल) S-1 लेव्हल 03
3) सुपरवायझर (T.O. इलेक्ट्रिकल) S-1 लेव्हल 02
4) सुपरवायझर (T.O. मेटलर्जी) S-1 लेव्हल 01
5) एन्ग्रेवर (स्कल्प्चर / मेटल वर्क्स) 01
6) ज्युनियर ऑफिस असिस्टंट, B-3 लेव्हल 13
7) ज्युनियर बुलियन असिस्टंट, B-3 लेव्हल 05
8) ज्युनियर हिंदी टायपिस्ट, B-3 लेव्हल 01
9) लॅबोरेटरी असिस्टंट, B-3 लेव्हल 01
10) ज्युनियर टेक्निशियन (फिटर), W-1 लेव्हल 47
11) ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट), W-1 लेव्हल 03
12) ज्युनियर टेक्निशियन (टर्नर), W-1 लेव्हल 09
13) ज्युनियर टेक्निशियन (कारपेंट्री), W-1 लेव्हल 01
14) ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन), W-1 लेव्हल 02
15) ज्युनियर टेक्निशियन (गोल्डस्मिथ), W-1 लेव्हल 01
16) ज्युनियर टेक्निशियन (मेल्टर), W-1 लेव्हल 02

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: प्रथम श्रेणी केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Chemical)
पद क्र.2: प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Mechanical)
पद क्र.3: प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Electrical)
पद क्र.4: प्रथम श्रेणी मेटलर्जी इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Metallurgy)
पद क्र.5: 55% गुणांसह फाइन आर्ट्स (Sculpture/Metal Works) पदवी
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.9: 55% गुणांसह B.Sc (Chemistry)
पद क्र.10: ITI (Fitter)
पद क्र.11: ITI (Chemical Plant Operator/Attendant Operator-Chemical Plant)
पद क्र.12: ITI (Turner)
पद क्र.13: ITI (Carpentry)
पद क्र.14: ITI (Electrician)
पद क्र.15: ITI (Gold Smith/Fitter)
पद क्र.16: ITI (Foundry)

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 27 एप्रिल 2026 रोजी, 18 ते 30 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : अनारक्षित, EWS आणि OBC उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST आणि PWD उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now