राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा वरणगावात निषेध

नोव्हेंबर 21, 2022 4:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी वरणगावात शिवसेना (ठाकरे) पक्षातर्फे निषेध करण्यात आला तसेच राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांनी त्वरित माफी मागावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

jalgaon 2022 11 21T165516.957

निवेदनाचा आशय असा की, राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी मराठवाडा विद्यापीठ पदवी प्रदान सोहळ्यात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील हिरो होते, आताच्या काळात गडकरी, फडणवीस हे हिरो आहे, असे वक्तव्य करुन तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी चारवेळा औरंगजेब यांची माफी मागितली, असे बेताल वक्तव्य केले. दोघांनी असे बोलून महाराष्ट्राची अस्मिता दुखावली असून कोश्यारी यांनी पूर्वीदेखील महात्मा फुले दाम्पत्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. वारंवार बेताल वक्तव्य करणार्‍या राज्यपाल यांना राष्ट्रपती यांनी पदमुक्त करावे तसेच राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विलास मुळे, तालुका उपप्रमुख सुभाष चौधरी, वरणगाव शहरप्रमुख संतोष माळी, अल्पसंख्यांक संघटक सईद शेख, जिल्हा युवासेना अधिकारी चंद्रकांत शर्मा, उप शहरप्रमुख सुखदेव धनगर, अशोक शर्मा, संजू कोळी, आबा सोनार, उपसरपंच उल्हास भारसके, प्रकाश कोळी, भुरा धरणे, प्रल्हाद माळी, इरफान खान, विक्की मोरे, राजेश महाजन, प्रवीण बकोळे, संजय खाराते, मोहन धनगर, शिवा भोई, किरणं माळी, राम शेटे, निलेश काळे, उमाकांत झांबरे, बाळू माळी, यशवंत बढे यांच्यासह शिवसैनिक मोठया संखेने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now