जामनेरात ‘हलगट’ सिनेमाच्या पोस्टरचे प्रमोशन ; गिरीश महाजनांनी निर्मात्याला घातली ही गळ

ऑक्टोबर 16, 2021 2:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । जामनेर येथे ‘हलगट’ या सिनेमाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाजन यांनी चक्क चित्रपटाचे निर्माते बाबुराव घोंगडे यांनाच सिनेमात काम देण्याची गळ घातली. महाजन यांनी चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि राधाकृष्ण विखेपाटील यांनाही सिनेमात घेण्याची विनंती निर्मात्याला केली. तर तुमच्यासाठी तर इंग्रजी सिनेमाच बनवावा लागेल असं सांगून निर्मात्यानेही महाजन यांची विकेट घेतली. त्यामुळे एकच हशा पिकला.

girish mahajan

काय म्हणाले नेमकं महाजन?

जामनेर येथील बाबुराव घोंगडे यांनी ‘हलगट’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्या सिनेमाच्या पोस्टरचे प्रमोशन आ.गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निर्मात्यांकडे महाजन यांनी भविष्यात आम्हालाही सिनेमात काम करण्याची संधी द्यावी, असे म्हणाले.  जित पवार, सुधीर मुनगंट्टीवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी आता आमदारकीची सहा टर्म झाली आहे. त्यामुळे उद्या पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया, अशी मागणी महाजन यांनी एका चित्रपट निर्मत्याकडे केली. तीस वर्षे आमदारकीची झाली आहेत. पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार? त्यामुळे पक्षाने आम्हाला उमेदवारी नाही दिली आणि आम्ही रिटायर झालो तर भविष्यात आम्हालाही सिनेमात काम करण्याची संधी द्यावी, असं महाजन म्हणाले.

दरम्यान, चित्रपट निर्माते बाबुराव घोंगडे यांनीही षटकार ठोकला. तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपट काढून त्यात काम करण्याची संधी देईन, असं घोंगडे यांनी म्हणताच एकच खसखस पिकली. जामनेर येथील बाबुराव घोंगडे यांनी ‘हलगट’ याचित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now