अरिहंत,सोनाळकर अकॅडमीतर्फे स्पर्धेचे बक्षीस वितरण

एप्रिल 18, 2022 12:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने अरिहंत व सोनाळकर अकॅडमीतर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

स्पर्धा

सदर स्पर्धा हि इयत्ता ५ वी ते ७ वी, इयत्ता ८ वी ते १० वी, इयत्ता ११ वी ते १२ व खुला अशा एकूण चार गटांमध्ये घेण्यात होती. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षीस ठेवण्यात आलेले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनाळकर अकॅडमीचे संचालक कबीर वासंती शेखर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंग वाघ, व्याख्याते शेखर सोनाळकर, अरिहंत अकॅडमीच्या केंद्र प्रमुख वृषाली पाटील उपस्थित होत्या. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. दीपाली भालेराव यांनी सूत्रसंचालन केले तर कबीर वासंती शेखर यांनी आभार मानले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now