जळगाव शहरात वाढतेय गरिबी ; वाचा कशी ?

जळगाव लाईव्ह न्यूज | १० जानेवारी २०२३ | दरवर्षी जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर शिष्यवृत्तीची योजना आखण्यात येते. योजनेत भाग घेण्यासाठी विविध प्रकारचे निकष लावण्यात येतात.यंदाही असेच निकष लावण्यात आले होते. गेल्या वर्षी एकच विद्यार्थिनी यासाठी पात्र झाली होती. मात्र यंदा मनपा शिष्यवृत्तीसाठी अडीच हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.

झाले असे कि, शहरहद्दीतीलच विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासंदर्भात एक भली मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या योजनेची सुरुवात महिला व बालकल्याण विभागाचे तत्कालीन उपायुक्त श्याम गोसावींनी केली होती आणि यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे हाच हेतू होता. मात्र मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने यातून पात्र विद्यार्थी निवडण्याचे आवाहन मनपा समोर आहे.


शहर महानगरपालिकेतर्फे १५ डिसेंबर २०२१ ला महासभेत ठराव क्रमांक ६९२ नुसार या योजनेला मान्यता मिळाली होती. तर जळगाव हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी ६ जानेवारी २०२२ रोजी शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासंदर्भात जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. या जाहिरातीत विद्यार्थी जळगाव हद्दीतीलच असावा, तो केसरी कार्ड धारक असावा, त्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६० हजाराच्या आत असावे यासह अजून काही अटी व शर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी मनपामध्ये दोन ते अडीच हजार विद्यार्थांनी अर्ज केले होते.

त्यातून १० वी चे ९३३ तर १२ वी चे २२८ अशा एकूण ११६१ विद्यार्थ्यांचे अर्ज मनपाने प्रथमदर्शनी निवडले आहे. यात मनपातील अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या असमन्वयक्ततेमुळे अजुनही पूर्ण निकष न लावल्याने या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, शिवाय यातून पात्र विद्यार्थी निवडण्याचे आवाहनही अधिकाऱ्यांसमोर येऊन ठेपले आहे. तर यातच १० वी च्या विद्यार्थांना १० हजार रु व १२ वी च्या विद्यार्थांना १५ हजार रु अशा प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले होते.

यानुसार मनपाने प्रथमदर्शनी निवडलेल्या या अर्जदारांना निधी द्यावयाचा म्हटल्यास मनपाच्या तिजोरीतून आजच १ कोटी २७ लाख ५० हजार रु द्यावे लागणार आहे. यापूर्वी मागील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ मध्ये याच योजनेअंतर्गत एकच विद्यार्थिनी या योजनेस पात्र ठरली होती.