शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली! PM किसानचा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा..

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२३ । पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतर्गत चालू आर्थिक वर्षातील अखेरचा हप्ता जानेवारी महिन्यातच जमा होणे अपेक्षित असतांना महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग न झाल्याने विशेष करून अल्पभुधारक शेतकरी बांधवांचा हिरामोड झाला होता.हप्त्यातर्गत मिळणारी दोन हजाराच्या रकमेचे साहाय्य रब्बी हंगामादरम्यान शेतकरी बांधवांना होत असते.

अनेक गरजु शेतकरी बांधवांकडुन होत असलेली प्रतिक्षा आता संपणार असुन येत्या चार दिवसांत म्हणजेच दि २४ फेब्रुवारी रोजी योजनेला चार वर्षे पुर्ण होण्याच्या पार्श्र्वभूमीवर या चालु आर्थिक वर्षातील अखेरचा हप्ता शेतकऱ्यांच्या बॅकखात्यात जमा केला जाणार असल्याचे संकेत प्रशासकिय सुत्रांकडुन मिळत आहे.

याबाबत शासनाकडुन कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी २४ फेब्रुवारी रोजी दोन हजाराची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत.