पिंप्राळा शिवारात अवकाळी पाऊस व वादळामुळे मोठया प्रमाणात नुकसान : रोहिणी खडसे यांनी केली पाहणी

मे 30, 2021 8:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ । रोजी कुऱ्हा परिसरातील रिगाव आणि पिंप्राळा शिवारात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे घरांची पडझड झाली तसेच शेती शिवारात मोठया प्रमाणात नुकसान झाले. जुने पिंप्राळा शिवारात असणाऱ्या चैतन्य हनुमान मंदिर येथे मंदिराजवळ असणाऱ्या पिंपळ आणि कडुलिंबाची फांदी तुटून पडल्यामुळे महंत दरबार पुरी महाराज आणि इतर चार भाविक गंभीर जखमी झाले
तसेच येथे असणाऱ्या गोशाळेतील दोन गायी मृत्युमुखी पडल्या व काही गंभीर जखमी झाल्या आहेत. रिगाव येथे सुद्धा वादळामुळे घरावरील पत्रे उडाली ,काही घरांवर झाडाच्या फांद्या कोसळल्या त्यामुळे घराचे आणि जनावरांच्या गोठयांचे नुकसान झाले शेती शिवारात सुद्धा मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

Rohini Khadse

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी पिंप्राळा आणि रिगाव येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तसेच तहसीलदार यांच्या सोबत चर्चा करून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे असे सांगितले. विद्युत वितरणचे अभियंता राठोड यांच्या सोबत चर्चा करून वादळामुळे तुटून पडलेल्या विद्युत तारांची जोडणी करून विद्युत पुरवठा लवकरात लवकर पुर्ववत करावा असे सांगितले.

यावेळी यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, डॉ बि सी महाजन, उपसरपंच पुंडलिक कपले, विशाल महाराज खोले, सरचिटणीस रविंद्र दांडगे,ओमप्रकाश चौधरी, रणजित गोयनका, डॉ गजानन खिरळकर, रमेश खंडेलवाल,रिगाव सरपंच निर्मलाताई पारधी , उपसरपंच शोभाताई गणेश विटे ,ग्रामपंचायत सदस्य सुरेश खंडरे, पोलीस पाटील युवराज बगळे, गोपाळ रामभाऊ पाटील ,शिवाभाऊ पाटील,अनंताभाऊ पाटील, गणेशभाऊ विटे,प्रभूसिंग बळूगे ,तलाठी संतोष गायकवाड, कोतवाल एकनाथ हळदे ,सचिन पाटील, संदिप डीवरे ,माणिकराव पाटील ,योगेश विटे, तेजराव भोलाणकार ,सुकलाल विटे ,अमोल बगळे,शंकर विटे , पिंटू कांडेलक, संतोष शंकर विटे , तोताराम खंडारे , सारंगधर कोळी, रवि पाटील, संतोष कांडेलकर, राजेश ढोले, प्रवीण दामोदरे, मुन्ना बोडे, विवेक पाटील ,सोनू इरफान मिस्त्री ,अतुल ठाकुर, निखिल मालगे, रुपेश माहुरकर ,आशिष हीरोळे, गणेश भोलानकर ,प्रमोद भोलाणकार ,नितेश राठोड ,सुशिल भुते, मयुर साठे, शुभम खंडेलवाल, आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories