⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात फिनीक्स २०२२ टेक्निकल इव्हेंट उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । विद्यार्थ्यांच्या सुप्‍त कलागुणांना अधिक वाव मिळावा या हेतुने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात फिनीक्स २०२२ टेक्निकल इव्हेंटचे आयोजन मंगळवार दि.२२ एप्रिल रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लिग्रँड इंडिया गृपचे व्हाईस प्रेसिडेंट सुरेश देवटाळू यांच्यासमवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, तंत्र निकेतनचे समन्वयक प्रा.दिपक झांबरे, सर्व विभागप्रमुखांची उपस्थीती होती.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी संपूर्ण इव्हेंटची रुपरेषा सांगितली. याप्रसंगी प्रमुख अतिथी सुरेश देवटाळू यांनी मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतांना वेगवेगळ्या गुण वैशिष्ठ्यांवर भरण असणे गरजेचे असल्याचे नमुद केले. आपल्या अंगी संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, सादरीकरण कौशल्य, वकृत्व, स्टेज परफॉरमन्स कौशल्य वाढवायचे असतील तर अश्या टेक्निकल इव्हेंटमध्ये भाग घ्यावा तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांनी महत्वाचे मुद्दे उदाहरणासहीत स्पष्ट केले.

फिनीक्स २०२२ हा विद्यार्थ्यांसाठी टेक्नीकल इव्हेंट असून त्यात नाविण्यपूर्ण इव्हेंटचा समावेश करण्यात आला होता. त्या शार्क टँक, मिनी हॅकेथॉन, क्विझस्टार, जंक यार्ड व अ‍ॅडमॅड शो अशा प्रकारचे इव्हेंट होते. यात जळगाव, धुळे, मलकापुर, बुलढाणा आणि नंदूरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. शार्कटँक इव्हेंटसाठी प्रा.सचिन महेश्री यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेश चौधरी, पौर्णिमा साबळे, नरेंद्र महाजन, मिनी हॅकेथॉनसाठी प्रा.भावना झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव सोनार, नेहा कोलते, दिक्षा पाटील, क्विझस्टारकरीता प्रा.हेमराज धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लिना चौधरी, अश्‍लेषा तायडे, जंकयार्डकरीता प्रा.योगेश वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेख अजहर,वर्षा पाटील तर अ‍ॅडमॅड शोसाठी प्रा.निलेश चौधरी यांच्या मार्गदर्शनखाली वैष्णवी डोसे, रोशनी पाटील, हर्षल परदेशी यांनी काम पाहिले.

अन्य महाविद्यालयात जाऊन फिनीक्स इव्हेंट संदर्भात कॅम्पेनिंग प्रतिनिधी म्हणून नितीन चौधरी, रुची परदेशी, अश्‍लेषा तायडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेते. संपूर्ण फिनीक्स इव्हेंटचे प्रमुख समन्वयक म्हणून प्रा.माधुरी झंवर यांनी काम पाहिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून रोहन नारखेडे, सनी भारंबे, प्रतिक खर्चे, देवेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्यासमवेत अ‍ॅकेडमिक डिन प्रा.हेमंत इंगळे, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा.दिपक झांबरे यांच्यासह सर्व विभागातील प्रमुखांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुची परदेशी, श्रीवत्स निगम यांनी केले.