जळगाव लाईव्ह न्यूज । आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने देशातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पूर्वेकडील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्याचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे.

देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून नवीन दर लागू केले आहेत. ताज्या दरवाढीनुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ८७ पैशांची, तर डिझेलच्या दरात ९१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

आजच्या दरवाढीनंतर आता जळगाव मध्ये पेट्रोलचे दर १०८.६० रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९५ रुपयेपर्यंत प्रति लिटरवर पोहोचले आहे.










