⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जळगावकरांनो.. शासकीय कामांसाठी लागणारी कागदपत्रे अत्यल्प दरात इथे काढून मिळताय!

Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, जळगावच्या वतीने शासकीय कामांसाठी लागणारी सर्व कागदपत्रे अत्यल्प दरात काढून देण्याची सेवा शहरातील दक्षता पेट्रोल पंपा समोर भास्कर मार्केट, जळगाव येथे सुरू करण्यात आली आहे. यावेळी महापौर जयश्रीताई सुनील महाजन या उपस्थित होत्या.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, जळगाव यांच्या वतीने हा उपक्रम सुरु करण्यात आला असून याचा सर्व जळगाव करांनी लाभ घेऊन सेवेची संधी द्यावी, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहेत.

शासकीय कागदपत्रे म्हणजे कोणती?
आधार कार्ड, पॅनकार्ड, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलीयर, जातीचा दाखला, डोमेसाईल, शॉप ऍक्ट, उद्योग आधार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मनी ट्रान्सफर, डिजीटल 7/12, कलर प्रिंट, गॅझेट, पोलीस व्हेरीपिकेशन