⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | तरवाडे पेठ येथे वडापाव विक्रेत्याला मारहाण

तरवाडे पेठ येथे वडापाव विक्रेत्याला मारहाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे पेठ येथील वडापाव विक्रेत्याला लोखंडी झारा आणि सळईने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी येथील ग्रामीण पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील तरवाडे येथील रहिवाशी सोपान निंबा पावले (वय २५) हे पाववडा विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता गावातील साईबाबा मंदीराचे गेटसमोरील ठिकाणी ते वडापाव विक्री करण्याचे दुकान लावलेले असताना गावातील राजेंद्र एकनाथ गढरी, डिगंबर एकनाथ गढरी, कृष्णा डिगंबर गढरी व एकनाथ काशिनाथ गढरी हे पाववडा गाडीवर येवून आलेल्या गिऱ्हाईकांना व सोपान पावले यांना शिवीगाळ करून वाद निर्माण झाला. यात चौघांना लोखंडी सळई आणि लोखंडी झारा डोक्यात मारून गंभीर दुखापत केली आहे. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण करीत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह