---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

गांजा तस्करीविरुद्ध एरंडोल पोलिसांची कारवाई ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक दोन तरी गांजा जप्तीची कारवाई होताना दिसत असून अशातच आणखी एकाला गांजासह पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १९ किलो गांजा व मोटारसायकल असा एकुण २ लाख 80 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाणे परिसरात झाली असून संशयित आरोपी विरुद्ध एनडीपीएसची कारवाई करण्यात आली आहे.

ganajaernaodl

कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात गांजा विक्री होत असल्या बाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन हद्दीत वेशांतर करुन मागील ५ दिवसांपासून सपोनि, निलेश राजपुत व त्यांच्या पथकाने गांजा पकडण्यासाठी सापळा रचला होता. सुरवातीचे ४ दिवस अपयश मिळाले. परंतु दि. २५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी एरंडोल कडून कासोदा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वनकोठे गावाजवळ एक संशयित व्यक्ती त्याच्या मोटार सायकलवर प्लास्टीकचे गोणीत गांजा घेवून जात असल्याची माहीती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचून त्याची मोटारसायकल पाठलाग करून थांबवली. त्याचे मोटारसायकल वरील गोणी चेक केली असता त्यात खाकी रंगाचे पॅकींग टेपने पैक केलेले चौकोनी आकाराचे पुडे मिळुन आले ते फोडुन चेक केले असता त्यामध्ये गांजा मिळुन आला.

---Advertisement---

संशयीत व्यक्ती अजय रविंद्र पवार वय २७ रा. सोनबडी ता. एरंडोल याला ताब्यात घेवुन त्याचेकडुन १९ किलो गांजा व मोटारसायकल असा एकुण २,८०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोहेको नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीनुसार गांजाची वाहतुक करणाऱ्या इसमाविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे एनडीपीएस अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment