नशिराबाद येथे संत शिरोमणी सावता महाराजाची पालखी दिंडी

जुलै 27, 2022 12:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । नशिराबाद येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात वारकरी संप्रदाय चे आद्य प्रचारक श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची संजीवन समाधी सोहळा हभप पाटील यांच्या हस्ते पालखीचे पुजन करून पालखी दिंडी आज मोठ्या हर्ष ऊत्साहत टाळ, मृद्गगाच्या, व वारकरी संप्रदाय च्या भक्तिभावात सर्वप्रथम श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या मुर्तीचा अभिषेक सपत्नीक कांचन व किरण माळी यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता करून हा कार्यक्रम पार पडला.

nashirabad 1 1

या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष सुनिलशास्त्री महाराज, माजी सरपंच विकास पाटील, माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळ चे कार्याध्यक्ष योगेश पाटील, शिवसह्याद्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश चव्हाण, माजी सरपंच पंकज महाजन, शिवसेना शहर प्रमुख विकास धनगर, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव माळी, संदीप रणधीर, हभप पाटील, सुरेश माळी, सोपान महाजन, जगन पाटील, महेश माळी, दगा महाजन, सुधाकर महाजन, सजंय महाराज, तुळशीराम जगताप, सोपान शिवरामे, धनराज पाटिल, विठ्ठल माळी, मधुकर महाजन, प्रविण महाजन, अरूण पाटील, मोहन खारे, गणेश माळी व सुभाष माळी, सर्व भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ उपस्थित होते.

सदर मिरवणुक संत शिरोमणी सावता महाराज मंदिरापासून फुले चौक – मेनरोड -नाईक वाडा या मार्गे पालखीवर पुष्प वृष्टी करून भव्य स्वागत गावातील भाविकांनी केले व महादेव मंदिराजवळ दिंडीची सांगता करण्यात आली. यानंतर काल्याचे भजन द्वारे व महाराजांच्या आरती ने कार्यक्रम करण्यात आला नंतर सर्वांनी महाप्रसादाचा स्वानंद घेतला.

या कार्यक्रमास सर्व मार्गदर्शन हभप व सुनिल शास्त्री महाराज यांचे सहकार्य लाभले त्यास सचिव पंढरीनाथ पाटील, अशोक पवार, संतोष पवार, हेमराज महाजन, भगवान पाटील, विकास पाटील, आबा पाटील, तेजस माळी, पत्रकार सुनिल महाजन, हर्षल महाजन, सचिन महाजन, संदीप जगताप, निलेश महाजन, रितेश महाजन, सुपडू चौधरी, वासुदेव महाजन, सुनिल महाजन व कार्यक्रमासाठी सर्व भजनी मंडळी, स्वयंपाकी नामदेव गुरूजी माळी, प्रभाकर पवार, बाबूलाल महाजन, चंदू फेगडे सुधीर महाजन, काशिनाथ महाजन, संस्था पदाधिकारी, सदस्य,सर्व शाखा अध्यक्ष, युवक मंडळाचे कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now