पाचोऱ्याच्या पत्रकाराचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

फेब्रुवारी 18, 2022 3:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । पाचोरा येथील भडगाव रोडवरील दत्त कॉलनी परिसरात ‘पोलीस आजतक’ या साप्ताहिकाचे संपादक प्रविण (बाबा) दिवटे (वय-४५) हे राहतात. दि.१७ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान नाशिकरोड येथे रेल्वेच्या धक्क्याने त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली.

patrakar accident jpg webp

पाचोरा येथील पत्रकार प्रविण (बाबा) दिवटे हे गेल्या आठ दिवसांपूर्वी नाशिक येथे आपल्या कुटूंबियासह वास्तव्यास गेले होते. नाशिकरोड येथे रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. यांचे पश्चात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार असून त्यांचे मृत्यूप्रकरणी नाशिक येथील रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचेवर आज दि. १८ फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पाचोरा येथील बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक रामजी धनजी दिवटे यांचे मोठे चिरंजीव व युनियन बँकचे कर्मचारी संदिप दिवटे यांचे मोठे बंधू होते.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now