⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

पी. जी. महाविद्यालयात बौद्धिक संपदा हक्क वर चर्चासत्र

जळगाव लाईव्ह न्यूज ।९ एप्रिल २०२२ । येथील के. सी. ई च्या पी. जी. महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ०७ एप्रिल २०२२ रोजी “बौद्धिक संपदा हक्क’’ या विषयावर चर्चासत्र नुकतेच पार पडले.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. व्ही. एस कांची, ग्रंथपाल मू. जे. महाविद्यालय जळगाव, आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्राध्यापक संदीप पाटील उपस्थित होते.

चर्चासत्रात महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थी व शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा म्हणजे काय? वांग्मय चौर्य आणि त्याचे जतन कसे करता येईल यासंदर्भात डॉ. व्ही. एस कांची यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.