‘राष्ट्रीय पोषण माह’अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन!

सप्टेंबर 23, 2022 7:29 PM

Muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । कुपोषित बालकांच्या सर्वांगीण पोषणासाठी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या केंद्रीय महिला व बालविकास विभागमार्फत ‘सही पोषण – देश रोशन’ या योजनेंतर्गत ‘राष्ट्रीय पोषण माह’ अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, मुक्ताईनगर यांचे मार्फत खासदार रक्षा खडसे प्रमुख उपस्थितीत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

jalgoan 18 1

यावेळी स्वस्थ बालक स्पर्धा मध्ये ६ महिने ते ३ वर्ष व ३ वर्ष ते ५ वर्ष वयोगटातील सदृढ बालकांना खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते प्रमाणपत्र व बक्षिस देऊन गौरविण्यात आले. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मार्फत विविध स्पर्धात तयार करण्यात आलेल्या कलाकृतींचे यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.

यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह भाजपा तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, माजी प.स.सदस्य राजेंद्र सावळे, भाजपा शहराध्यक्ष पंकज कोळी, गटविकास अधिकारी हेमंतकुमार काथेपुरम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक बिराजदार, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती कल्पना तायडे-कासोदे, गटशिक्षण अधिकारी दलपत थाळी, शिक्षण विस्तार अधिकारी राजु तडवी, मेश्राम, पर्यवेक्षक सुनिता पाटील व तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories